आठवणीतील आत्या

आठवणीतील आत्या
पाच आत्या असल्या तरी प्रत्यक्ष आठवणीतील सहवास ३ आत्यांचा "लिलू आत्या, बेबी आत्या आणि शांता आत्या."

काकूकडे सुट्टीत राहीला गेल्यावर सगळीकडे एक-एक दिवस जात असे मी, लिलू आत्याकडे गेले की दिवसभराचा मुक्काम झाला तरी थांब ग जयश्रीची (ताई) भेट होईल म्हणून आत्या आग्रह करायची. तिथून निघताना, कशी जाशील... रिक्षा कर वहिनींनकडे गेलीस की फोन कर पोहचल्याचा घरी सांगणारी प्रेमळ काळजी करणारी आत्या. दडपे पोहे आणि instant चिवडा ह्या सारखा पटकन एक पदार्थ आत्या करायची तो मला आवडायचा. प्रत्येक दिवाळीत कितीही कपडे असले तरी "लीलूआत्या" कडून येणारा ड्रेस (गिफ्ट) म्हणजे ख़ुशी असायची. माझा हाताची आमटी-भाजी आवडली की बाबा लिलू आत्या सारखी चव आहे तुझ्या हाताला म्हणायचे.

माझा आयुष्यातलं  पहिलं 'पुणादर्शन' "बेबी आत्या" मुळे झालं. ८ दिवस मस्त पुण फिरलो. बाबांना काही झालं की  बेबीला बोलावं म्हणायचे की मी धावत आत्याकडे जायचे. तु  हो पुढे मी आलेच म्हणत, माझ्या पाठोपाठ घरी पोहचणारी, धीर देणारी बेबीआत्या. माझ्याकडे अभ्यासाला ये आणि हो तो केला की नाही cross verify करणारी आत्या. "स्वछता" म्हटलं की फक्त बेबी आत्या. आणि शांतपणे मंद समईच्या ज्योतीत एकाग्रतेने नामस्मरण करणारी बेबी आत्या मला आठवते.

पावभाजीची ओळख जीने करून दिली ती "शांता आत्या" पावभाजी, गुलाबजाम, दहीवडे आणि दही म्हटलं की फक्त शांता आत्या. आजही मधुर, कवडी पडणार, भरपूर दही तिची आठवण करून देत. १० वी पस झाले तेव्हा कौतुक करण्यासाठी पहिली पोहचणारी 'फाईल' घेऊन आणि ही फाईल खूप certificate ने भरून दे असा आशीर्वाद देणारी (खरच फाईल भरली  certificate नी) आत्या. १० वी १२ वी च कौतुक असो, विजयाताईच लग्न आणि नितीन दादाचं लग्न ह्या सगळ्या वेळी खूप फिरवलंय मी तिला ड्रेस साठी, (आई सांगायची शांता वंस ती डोंबिवली फिरवेल ड्रेससाठी) असू दे ग म्हणत खरच खूप फिरून आवडीचा ड्रेस घेऊन द्यायची. गणपतीत आत्याच्या घरी आरासीला जायचो मज्जा यायची तू करशील ती सजावट म्हणायची. कॉलेजला होते मी कुठल्या ही लग्नाला जायचं कि फोन करायची चल ग माझ्या बरोबर.

अशा एक ना अनेक गोष्टी...मनापासून भरपूर कौतुक करणाऱ्या मायाळू आत्या मला लाभल्या सांगा आहे का नाही मी भाग्यवान. 

आज आठवणीतील आत्यांच्या आशिर्वादाची शिदोरी माझ्या जवळ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

श्रावणी बिनीवाले


Popular Posts