Skip to main content

Posts

Featured

अन्नपूर्णे- सदापूर्णे

अन्नपूर्णे- सदापूर्णे अन्नपूर्णा देवीला, चैत्र तृतीया ते अक्षय्य तृतीया झोपाळ्यात बसवून पूजा केली जाते. रोज वेगवेगळी खिरापत नैवेद्याला केली जाते. हळदी कुंकू समारंभ, नित्य अन्नपूर्णा स्तोत्र पठण, वैगरे थोडक्यात उपासना करण्याची परंपरा काही ठिकाणी आपल्याकडे आहे. जे मलाही आवडत! सुरुवातीला मी देखील हे व्रत महिनाभर करायची. पण आम्ही अजाणतेपणी एकदा बाहेर फिरायला गेलो आणि आई म्हणाली पाहुण्यांना बोलावून बाहेर जातात का? तसंच आहे समज... माहेरवाशीण आहे ती, करायचं असेल तर व्यवस्थित कर. माझ्या सासरी-माहेरी ही प्रथा नाही.पण आजोळी आहे!  माझी आई चैत्रगौरीचे हळदीकुंकू खूप छान करायची. खूप मौज वाटायची. सजवलेली चैत्रगौर, त्यापुढे आरास,  चैत्रांगण, चाफा-मोगऱ्याचा सुगंध, दारावर आंब्याची डहाळी-तोरणं, सडा-रांगोळी, चंदनाच्या वाटीत शिंपला, वाळा अत्तर, गुलाबपाणी, केशर वेलचीयुक्त पन्हं, आंब्याची डाळ, कलिंगडाच्या फोडी, काकडीचे काप, द्राक्षांचा गड, करंज्या, खिरापत, गोड सुपारी, हरभऱ्यानंची ओटी, भरजरी रेशमी साड्या आणि घर सुद्धा छान नटलेल, प्रसन्न वातावरण! खूप जणी येणार...मला खूप मज्जा वाटायची. नवीन ड्रेस मिळायचा, दिवाळ

Latest Posts

आठवणीतील आजोळ - मऊभाताची मेजवानी

आठवणीतील आत्या

|| माझी काकू ||