|| माझी काकू ||

 "घटाघटांचे रंग वेगळे"  त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक काकूची काहीना काही गोष्ट मला आवडते. 

माझ्या प्रत्येक काकू मला प्रियच. सहवासाने नातं फुलतं असं म्हणतात, तर थोडस माझ्या लाडक्या काकू बद्दलं, प्रेम करण्यासाठी तुम्हाला कोणी मिठी मारावी लागत नाही. डोळ्यात पाणी आलं म्हणजे प्रेम असत असंही नाही.  गोड बोलल म्हणजे प्रेम असतच असं नाही.  तर नावातच "प्रेमा" आणि "सुधा" म्हणजेच "प्रेम -मधुर" असणारी माझी काकू.

मी तिच्या घरी गेल्यावर दार उघडताना मनापासून आनंदाने हसणारी काकू. मला कधीही न ओरडणारी काकू. खाण्या पिण्यापासून सगळे लाड करणारी माझी काकू.  कुठेही तिच्या बरोबर नेणारी (तिच्या माहेरचे कार्यक्रम असोत) ते अगदी कोणीही घरी आलेले असो माझा मुक्काम कधीही चालू देणारी माझी काकू. कुठलीही गोष्ट असो, मग काही आणायला सांगताना किंवा एखादी छोटीशी जबाबदारी असो १००% विश्वास दाखवणारी माझी काकू. बाबांच्या आजारपणात मला फोन करून भक्कम आधार देणारी माझी काकू. देव 'माणसात' बघणारी माझी काकू (जिथे गरज असेल.. ज्याला असेल.. जशी असेल..त्याप्रमाणे मदतीचा हात देणारी माझी काकू). आमटी भातापासून ते सॅंडवीच - पाणीपुरी सगळे पदार्थ खिलवणारी माझी काकू आणि Picture पासून ते Cricket, Tennis पर्यंत enjoy करणारी माझी काकू. लहानांबरोबर लहान होणारी आणि मोठ्यांबरोबर मोठी होणारी माझी काकू. अशा ह्या माझ्या प्रेमळ, प्रॅक्टिकल सुधा काकूला शतशः प्रणाम. 🙏🙏

श्रावणी बिनीवाले

Popular Posts